केळी लागवड पध्दतीलागवड पध्दती I पिक संरक्षण
केळी पिकास लागवडीपुर्वी 1 एकर क्षेत्रात ५ ते १० बैलगाडया भरुन कुजलेले शेणखत, ५०० किलो निंबोळी पेंड तसेच ५०० किलो गांडुळ खत घालावे. त्यासोबतच २५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट द्यावे. लागवड करण्यापुर्वी जमिनीत थायमेट एकरी १० किलो, व मॅन्कोझेब ५०० ग्रॅम ते १ किलो टाकावे. तसेच जर बेण्यापासुन लागवड होणार असेल तर २०० लिटर पाण्यातुन ५०० मिली क्लोरोपायरीफॉस, ५०० ग्रॅम मॅन्कोझेब व २५० ग्रॅम बाविस्टीन तसेच २०० ग्रॅम पोटॅशियम ह्युमेट ग्रॅन्यअल्स, व १०० ग्रॅम सिलीका च्या द्रवाणात १००० खोड ५ मिनीट बुडवुन मग लागवड करावी. केळी लागवड करतांना परिसरातील करपा (सिगाटोका) रागाच्या लागणीच्या अनुभवानुसार योग्य अंतरावर लागवड करावी. खालिल तक्त्यात केळी पिकांच्या लागवड अंतरानुसार किती रोप बसतिल या बाबत आकडे दिलेले आहेत.
केळी लागवडीचा हंगाम -
केळीची लागवड खरिप, रब्बी आणि काही भागात उन्हाळी हंगामात देखिल केली जाते.
केळी पिकाच्या वाढीच्या अवस्था –
केळी पिकांस द्यावयाच्या जमिनीतील खतांचे वेळापत्रक पुढील प्रमाणे आहे. (किलो प्रती १००० खोड)
केळी पिकाची पालाशची गरज ही जास्त असल्या कारणाने त्या पिकासाठी देण्यात येणा-या रासायनिक खतांच्या शिफारशीत मॅग्नेशियम सल्फेट चे प्रमाण १०० किलो प्रती १००० खोड करण्यात आले आहे. या १०० किलो मॅग्नेशियम सल्फेट खतांतुन ९ किलो मॅग्नेशियम पिकास मिळतो. पालाश युक्त खतांच्या जास्त वापराने केळी पिकांत मॅग्नेशियमची कमतरता सतत जाणवत असते, शिवाय या कमतरतेमुळे मुळांच्या वाढीवर तसेच केळीच्या आकारावर विपरित परिणाम जाणवतात. केळी पिकांस पालाश युक्त खतांसोबत मॅग्नेशियम चा वापर करु नये.
तसेच वरिल पत्रका व्यतिरिक्त देखिल पालाश चे प्रमाण ५०० किलो प्रती १००० खोड पर्यंत वाढवता येते.
वरिल खतांचे शिफारस पत्रक हे रावेर, यावल तसेच मुक्ताईनगर परिसरात काम करित असतांना केळी पिकाच्या पक्वतेच्या काळातील नत्र तसेच पालाश खतांच्या वापरातुन आढळुन आलेल्या उत्पादन वाढीवरुन तयार केलेले आहे.

0 Comments